आरोग्य हीच प्राथमिक संपत्ती (Wealth and Asset)
भाषा निवडा / Read in: मराठी | हिन्दी (जल्द ही) | English (Coming Soon) आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक फक्त पैसा कसा कमावता येईल याकडे लक्ष करतात परंतु याच पैसे कमावण्याच्या धुंदीत अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय, "आरोग्य नेमके का आणि कसे जपावे" हेदेखील आपल्याला कोणीही मुळापासून समजावून सांगत नाही. या समस्येला तोंड देण्यासाठी हा लेख लिहिण्यात येत आहे. आपण याला अनेक छोट्या मुद्यांमध्ये वाटून अभ्यासूया. Wealth आणि Asset मधील फरक Wealth - याचा अर्थ होतो की आपल्याकडे एकूण किती संपत्ती जमा आहे अर्थात आपला एकूण पोर्टफोलियो किती. लक्षात घ्या संपत्ती म्हणजे पैसे नव्हे. Asset - याचा अर्थ अशी संपत्ती जी आपल्याला भविष्यात आणखी संपत्ती गोळा करून व वाढवून देईल. आरोग्य हीच प्राथमिक संपत्तीचा ठळक अर्थ "आरोग्य हीच प्राथमिक संपत्ती" चा ठळक अर्थ असा की "कोणत्याही कामापेक्षा आरोग्य हे सर्वोच्च". मग ते दैनिक काम अस...